KDMC क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

By मुरलीधर भवार | Published: March 24, 2023 03:08 PM2023-03-24T15:08:17+5:302023-03-24T15:09:46+5:30

अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, मंत्री उदय सामंत यांची सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती, मनसे आमदार राजू पाटील यांनी केला हाेता पाठपुरावा  

Action will be taken against officials guilty of unauthorized construction in KDMC area | KDMC क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

KDMC क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

googlenewsNext

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या द्वारे मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक झाली आहे. अनेक ठिकाणी रेराची व ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्थरीय चौकशीची मागणी देखील केली होती. शुक्रवारी हा प्रश्न सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झाल्या नंतर मंत्री उदय  सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. 

महापालिका क्षेत्रात असलेल्या शाळा,क्रिडांगण आणि आदी आरक्षित जागांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी अधिकृत बांधकामांची बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी देखील करण्यात आली आहे. यामध्ये टोकन घोटाळा देखील समोर आला होता. त्यावेळीच मनसे आमदार  पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देऊन उच्चस्थरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या बाबत चौकशी देखील सुरु आहे. मात्र यामध्ये फक्त काही ठराविक उद्योजकांची चौकशी हि केली जात आहे. मात्र या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होत.

मात्र या संदर्भात  आमदार  पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित प्रश्नी विधानसभेत भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आमदार पाटील यांनी देखील आवाज उठवला आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. मात्र वारंवार पत्रव्यवहार करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवून देखील कारवाई होत नसल्याने शुक्रवारी हा विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. कल्याण डोंबिवली मध्ये ६५ विकासकांनी ऱेराची फसवणूक केली आहे. यामध्ये फक्त वास्तुविशारद आणि जमीन मालकांना दोषी धरण्यात आले आहेत. मात्र या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न आमदार राजू पाटील आणि गणपत गायकवाड यांनी विधानसभेत मांडल्यानंतर अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

Web Title: Action will be taken against officials guilty of unauthorized construction in KDMC area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.