अदानी समूहाला एनआरसी कंपनीच्या जागेचा अद्याप संपूर्ण ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 03:28 PM2021-08-23T15:28:01+5:302021-08-23T15:28:22+5:30

जमीन अधिग्रहीत करण्यावर 200 कोटीचा खर्च; अदानी समूह सूत्रांची माहिती

Adani Group does not yet have full control of the NRC companys premises | अदानी समूहाला एनआरसी कंपनीच्या जागेचा अद्याप संपूर्ण ताबा नाही

अदानी समूहाला एनआरसी कंपनीच्या जागेचा अद्याप संपूर्ण ताबा नाही

googlenewsNext

कल्याण-आंबिवली नजीक असलेल्या एनआरसी कंपनीची 440 एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर लॉजिस्टीक पार्क उभारला जाणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहीत केली जात आहे. मात्र अदानी समूहाला कंपनीच्या जागेचा संपूर्ण ताबा अद्याप मिळविता आलेला नाही. कंपनीची जागा अधिग्रहीत करण्यासाठी अदानी समूहाने आत्तार्पयत 200 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांनी दिली आहे. 

 एनआरसी कंपनी सुरु होती तेव्हा कामगारांना राहण्यासाठी क्वार्टर्स दिले होते. क्वार्टर्स हे कामगारांच्या ताब्यात आहेत. अदानी समूहाने जमिनीची कायदेशीर खरेदी केली आहे.एनसीएलटीच्या आदेशानुसार कामगारांना 68 कोटी  देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची तयारी अदानी समूहाने दाखविली होती. मात्र ही मागणी कामगारांना मान्य नाही. एनआरसी कंपनीच्या 45 कामगारांनी औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. क्वार्टर्सचा ताबा कामगारांना देण्यात यावा. मे 2021 मध्ये न्यायालयाने अंतरिम आदेश देत क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडेच ठेवण्यास परवानगी दिली होती. हा आदेश चुकीचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने 17 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडे ठेवण्यास दिलेली परवानगी रद्दबातल ठरविली. तसेच हा खटला त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा खटला आयबीसीच्या 2016 नुसारच्या कायद्यांतर्गत येतो. त्यामुळे अदानी समूहाने क्वार्टर्समध्ये राहणा:या कामगारांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देणो हे बेकायदेशीर ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायालयाने कामगार वास्तव्याची परवानगी देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविला नसून खटलाच फेटाळून लावला असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रंनी दिली आहे. 

दरम्यान एनसीएलटी दिल्ली येथे कामगार अपिलात गेले आहेत. त्यांचे अपिल न्यायप्रविष्ट आहे. औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे दिल्ली येथील एनसीएलटीकडे पुढील सुनावणी दरम्यान काय निर्णय घेतला जाऊ शकतो याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर एनआरसी कंपनीच्या आवारातील क्वार्टर्स जीर्ण झालेले आहेत. धोकादायक आहे. ते तोडण्यासाठी नोटिसा दिलेल्या आहेत. ही घरे तोडण्यास कामगारांचा विरोध आहे. या धोकादायक इमारतीत वास्तव्य करणा:यांच्या जिवितास धोका होऊ शकतो असे एनआरसी कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Adani Group does not yet have full control of the NRC companys premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Adaniअदानी