केंद्रीय मंत्री नारायण राणे आज डोंबिवलीत, काय बोलणार याकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:56 PM2022-11-18T12:56:22+5:302022-11-18T12:57:46+5:30
संध्याकाळी राणे येणार डोंबिवलीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी डोंबिवलीत जाहीर सभा पार पडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर टीका केली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी (आज) डोंबिवलीत येणार आहेत. दरम्यान, राणे काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधतायत हे पाहावं लागणार आहे.
पश्चिमेकडील सम्राट हॉटेल येथील शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता डॉ. सर्वेश सावंत यांच्या नवीन रुग्णालयाच्या उदघाटनासाठी नारायण राणे येणार आहेत. यावेळी राणे हे राजकीय घडामोडींवर बोलण्याची शक्यता आहे. सावंत हे राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. कार्यक्रमानंतर राणे हे माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे.