अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

By प्रशांत माने | Published: November 7, 2022 10:21 PM2022-11-07T22:21:24+5:302022-11-07T22:21:49+5:30

डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात  राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. 

After 'that' statement by Abdul Sattar, protest movement by NCP | अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

Next

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द बोलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहे. यातच डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात  राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात पक्षाचे डोंबिवली विधानसभा कार्याध्यक्ष नंदू धुळे, कल्याण डोंबिवली जिल्हा सरचिटणीस समीर गुधाटे, डोंबिवली विधानसभा संघटक सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष सुखदेव पडळकर  यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सत्तार यांच्याविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: After 'that' statement by Abdul Sattar, protest movement by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.