कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण

By मुरलीधर भवार | Published: December 19, 2022 07:26 PM2022-12-19T19:26:47+5:302022-12-19T19:30:31+5:30

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली. 

After the death of the woman in Kalyan, the relatives vandalized the hospital  | कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण

Next

कल्याण: विष प्राशन केलेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करीत डॉक्टर आणि नर्सला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण येथील साई संजीवनी खाजगी रुग्णालयात घडली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 

15 डिसेंबर रोजी कल्याणमध्ये राहणाऱ्या गंगा शिंदे या महिलने विष प्राशन केल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला उपाचरासाठी कल्याण पश्चिमेतील साई संजीवनी खाजगी रुग्णलायात दाखल केले. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. उपचारात डॉक्टरांकडून हलगर्जीपणा केल्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी  रुग्णालयाची तोडफोड केली. त्यानंतर डॉक्टर आणि नर्सला बेदम मारहाण करण्यात आली. 

या घटनेची गंभीर दखल  कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मारहाण आणि तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. विष प्रशन करणो म्हणजे संबंधित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना देणे अपेक्षित होते. कारण की त्या महिलेचा मृत्यू झाला आहे तिच्यासोबत काय प्रकार घडला होता. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली असती तर त्या महिलेचा जबाब घेता आला असता. या अंगानेही पोलीस तपास करीत आहेत.

  

Web Title: After the death of the woman in Kalyan, the relatives vandalized the hospital 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.