बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेचा कबुलीजबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 07:08 IST2024-09-22T07:08:31+5:302024-09-22T07:08:55+5:30
शाळेच्या संचालकांपैकी अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे अद्याप फरार

बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेचा कबुलीजबाब
बदलापूर :बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने त्या शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीदरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला आहे.
बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवरील झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुलीजबाबाचे चित्रीकरण झाले.
दरम्यान, ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळेच्या संचालकांपैकी अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. इतर संचालकांची चौकशी केली जात आहे.