उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य आंदोलन करणा-यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:31 PM2021-03-15T18:31:40+5:302021-03-15T18:31:53+5:30
उल्हास नदी पात्रात होत असलेल्या प्रदूषण रोखणो व जलपर्णी काढणो या दोन प्रश्नावर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस नदी पात्रत आंदोलन केले.
कल्याण - उल्हास नदी पात्रात होत असलेल्या प्रदूषण रोखणो व जलपर्णी काढणो या दोन प्रश्नावर मी कल्याणकर संस्थेने १८ दिवस नदी पात्रत आंदोलन केले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनंतर आंदोलन २७ फेब्रुवारी रोजी मागे घेतले गेले. मात्र आंदोलन मागे घेताना प्रशासनाकडून दिले गेलेले आश्वासनाची अद्याप पूर्तता नाही. त्यामुळे प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी शून्य आहे याकडे आंदोलन करणारे नितीन निकम यांनी लक्ष वेधले आाहे.
उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे वतीने निकम यांच्यासह कैलास शिंदे व उमेश बोरगावकर यांनी आंदोलन केले होते. १८ दिवसानंतर पालकमंत्र्यांनी त्याठिकाणी भेट दिली. या भेटीच्या वेळी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी ही उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी तातडीने जलपर्णी काढण्यासाठी मशीन मागविण्यात यावे. त्याची निविदा काढावी असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. दरम्यान मशीन येई र्पयत मॅन्यूअली जलपर्णी काढण्यात यावी असे सूचित केले होते. मॅन्यूअली जलपर्णी काढली जात असली तरी मॅन्यूअली जलपर्णी काढणे इतके सोपे नाही. जलपर्णी मशीन द्वारे काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार होती. मात्र मशीन तयार नसते. ती तयार करण्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यात जून महिन्या उजाडणार असेल तर तोर्पयत पावसाळा येणार. त्यामुळे मशीन मागविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. मशीनची किंमत ३ कोटीच्या घरात आहे. तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर मिठी नदीच्या ठिकाणाहून मशीन मागविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मशीन मागवून जलपर्णी काढण्याचे आश्वासानाची पूर्तता होत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय चंद्रशेखर भडसावले या पर्यावर तज्ञांच्या मदतीने हर्बल फवारणी करुन जलपर्णी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जावा. त्यासाठी निकम यांनी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान भडसावले यांच्या मदत घेण्याच्या कामाचे काय झाले याची विचारणा केली. त्यावर नाव्रेकर यांनी नदीचे पाणी लाखो लोक पितात. हर्बल फवारणीने काही दुसरीच रिअॅक्शन झाल्यास त्याला जबाबदार कोण. त्याची शहानिशा केल्याशिवाय हा प्रयोग करता येणार नाही असे मत व्यक्त केले. त्यामुळे मशीन द्वारे जलपर्णी काढणे व हर्बल फवारणी करुन समूळ नष्ट करणे ही दोन्ही आश्वासने पूर्ण झालेली नाही. आंदोलन मागे घेऊन 16 दिवस उलटले तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. मग आंदोलन मागे घेण्याचा आग्रह का धरण्यात आला असा प्रतिप्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांच्या आश्वासना पश्चात आंदोलन मागे घेतले होते. पालकमंत्र्यांचीच भेट घेऊन निकम हा सगळा प्रकार त्यांना सांगणार आहेत.