मुंबई-वडोदरा मार्गासाठी कल्याण तालुक्यातील १६० हेक्टर जमीन संपादीत बाधिताना ५१५ कोटी रुपयांचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 02:13 PM2021-10-12T14:13:37+5:302021-10-12T14:14:41+5:30
कल्याण - मुंबई वडोदरा मार्ग हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात कल्याण तालुक्यातील १३ गावांची जमीन बाधित ...
कल्याण - मुंबई वडोदरा मार्ग हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात कल्याण तालुक्यातील १३ गावांची जमीन बाधित होत आहे. कल्याण उपविभागीय कार्यालयाच्या वतीने आत्तापर्यंत १६० हेक्टर जमीने संपादन केले असून प्रकल्प बाधितांना ५१५ कोटी रुपयांची रक्कम मोबदल्याच्या स्वरुपात वाट केली असल्याची माहितीचे कल्याण उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडेपाटील यांनी दिली आहे.
मुंबई वडोदरा हा मार्ग जेएनपीटी आणि मुंबई पुणे मार्गाला जोडणार जाणार आहे. हा एक महत्वकांक्षी प्रकल्प असून त्याला केंद्र सरकारने २००६ साली मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि पनवेल तालुक्यातून जातो. कल्याण तालुक्यात या मार्गाचा भाग १३ किलोमीटर इतका आहे. कल्याण तालुक्यातील कोंढेरी, सांगोडे, बल्याणी, उंभर्णी, नांदप, मानिवली, रायते, गोवेली, पिंपळोली, वाहोली, मांजर्ली, आपटी, आंबिवली तर्फे वासंद्री ही १३ गावे बाधित होत होती. या १३ गावातून या मार्गासाठी १६० हेक्टर जमीन आतापर्यंत संपादीत केली आहे. आत्ता केवळ २४ हेक्टर जमीनेच संपादन बाकी आहे.
भूसंपादन सूद्धा डिसेंबर २०२१ अखेर्पयत पूर्ण केले जाईल. काही न्यायनिवाडे शिल्लक आहे. ते देखील मार्गी लावण्याचे काम सध्या कल्याण उपविभागीय कार्यालच्या वतीने सुरू आहे. प्रकल्पात बाधितांची जमीन संपादन करताना त्यांना द्यावी लगणारी नुकसान भरपाईची रक्कम ५४८ कोटी रुपये इतकी होती. त्यापैकी ज्या बांधितांची जमीन संपादीत केली आहे. त्यांना आत्तार्पयत ५१५ कोटी रुपयांचा मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत मोबदला वाटपाचे काम कार्यालयाच्या मार्फत सुरु आहे असे उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले.
कल्याण उपविभागीय कार्यालयाने डेडीकेटेड फ्रेंट कॉरीडॉर या मालगाडी वाहतूकीसाठी असलेल्या महत्वाकांशी प्रकल्पासाठी लागणारी कल्याण तालुक्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच प्रकल्प बाधितांना मोबदल्याचेही वाटप करण्याची प्रक्रिया पार पाडली आहे. तसेच कल्याण तालुक्यातील कल्याण शीळ रस्ता सहा पदरीकरण आणि कल्याण कसारा तिसऱ्या रेल्वे लाईनचे कामाकरीताही भूसंपादन आवश्यक आहे. त्याची खेट खरेदी प्रक्रिया राबविली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने सक्तीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया राबविली जात असून प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा केला जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले.