महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाला मारहाण करणाऱ्या एका आरोपीला कोठडी

By अनिकेत घमंडी | Published: January 12, 2023 06:15 PM2023-01-12T18:15:55+5:302023-01-12T18:16:03+5:30

कल्याण पूर्व विभागातील हाजी मलंग फिडरवर वीजचोरी शोध मोहिम राबवताना काकडवाल गावात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह‍ दहा जणांच्या पथकाना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

An accused who beat up a team of 10 people, including the executive engineer of Mahavitaran, is in custody | महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाला मारहाण करणाऱ्या एका आरोपीला कोठडी

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाला मारहाण करणाऱ्या एका आरोपीला कोठडी

googlenewsNext

डोंबिवली: कल्याण पूर्व विभागातील हाजी मलंग फिडरवर वीजचोरी शोध मोहिम राबवताना काकडवाल गावात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह‍ दहा जणांच्या पथकाना बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ही संतापजनक घटना घडली असून रात्री उशिरा हिललाईन पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या दहा व मुंबई पोलीस अधिनियमाच्या विविध तीन कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

एका आरोपीला अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार आहेत. अटकेतील आरोपीला गुरुवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती महावितरणने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. अशोक दूधकर, संतोष दूधकर, जगदीश दूधकर, अनंता दूधकर आणि प्रकाश दूधकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अधिक वीजहानी असलेल्या हाजीमलंग फिडरवर गेल्या तीन महिन्यांपासून वीजचोरी शोधण्यासह सदोष मीटर बदलणे, ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणाची व्यापक मोहिम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत बुधवारी काकडवाल गावात सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांच्या पथकाने दूधकर यांच्या चार मजली इमारतीला अवघे अडीचशे रुपये वीजबिल येत असल्याने त्यांच्या वीज पुरवठ्याची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. परंतू तीन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाला काम करण्यापासून रोखत दूधकर कुटुंबियाने लाथा-बुक्क्या, लोखंडी सळई, लाकडी काठ्या व पाईपच्या तुकड्याने हल्ला करत पथकातील अभियंता व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचलेले कल्याण पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड व कनिष्ठ अभियंता प्रशांत राऊत यानांही दूधकर कुटुंबियांनी मारहाण केली. दूधकर कुटुंबियांच्या हल्ल्यात कार्यकारी अभियंता धवड यांच्यासह दहा अभियंते, कर्मचारी जखमी झाले.

तक्रार देण्यासाठी नेवाळी पोलीस चौकीत गेल्यानंतरही आरोपींनी पथकातील सदस्यांना शिविगाळ करत धमकावल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सहायक अभियंता नाहिदे यांच्या फिर्यादीवरून हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ या गुन्ह्याचा तपास करत आहेत. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दरम्यान हल्लेखोर आरोपींविरुद्ध कडक कारवाईसाठी कामगार संघटनाही आक्रमक झाल्या असून महावितरण प्रशासनाकडून कडक कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. 
 

Web Title: An accused who beat up a team of 10 people, including the executive engineer of Mahavitaran, is in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण