कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न

By मुरलीधर भवार | Published: November 3, 2023 04:23 PM2023-11-03T16:23:45+5:302023-11-03T16:23:58+5:30

माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता.

An attempt to lay claim to the site of Kalyan Fort Durgadi | कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न

कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगण्याचा प्रयत्न

कल्याण-किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न करणाऱ््याच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयश शिर्के सातवाहन असे या व्यक्तीचेने नाव आहे. तो माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याचे त्याने म्हटले हाेते. त्याने किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यासाठी सबळ कागदपत्रे सादर केली नसल्याचे उघड झाले आहे.
कल्याणमधील किल्ले दुर्गाडी हा स्थान शिवकालीन आहे. किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे.

माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमिनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. हा अर्ज जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्याठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयास प्राप्त झाला. कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे की, ज्या जागेसंदर्भात शिर्के सातवाहन याने नाव लावण्याकरीता अर्ज केला होता. त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकीत आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले.

अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आले असे मंडळ अधिकारी गुडे यांनी म्हटले आहे. तसा अहवालच गुडे यांनी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांना सादर केल्यावर देशमुख यांच्या आदेशानुसार गुडे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिर्के याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात तहसीलदार देशमुख यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचे पुरावे त्याने सादर केलेले नव्हते.

Web Title: An attempt to lay claim to the site of Kalyan Fort Durgadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.