डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून आयटी इंजिनिअर तरुणाला मारहाण
By मुरलीधर भवार | Published: December 23, 2023 04:14 PM2023-12-23T16:14:49+5:302023-12-23T16:15:25+5:30
शहराच्या पूर्व भागातील श्रीखंडे वाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो.
डोंबिवली-स्टेशन परिसरातील मधूबन थिएटरजवळ एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला. याचा जाब तरुणाने फेरीवाल्यास विचारला. या गोष्टीचा राग आल्याने तीन चार फेरीवाल्यांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुधीर पगारे असे आहे. तो आयटी इंजिनिअर आहे. फेरीवाल्यांकडून त्याला मारहाण झाल्याने रस्ते आणि फूटपाथ आडवून बसणाऱ््या फेरीवाल्यांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
शहराच्या पूर्व भागातील श्रीखंडे वाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. एक दिवसापूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधूबन थिएटरच्या गल्लीत गेला होता. तो त्या ठिकाणाहून जात असताना त्याला एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्या फेरीवाल्याला जाब विचारला. जाब विचारल्याने रागात आलेल्या फेरीवाल्यासह चार ते पाच फेरीवाल्यानी सुधीर याला पकडून मारहाण केली. या घनटेमुळे फेरीवाल्याची दादागिरी उघड झाली आहे.
सुधीर पगारे यांचे म्हणणे आहे की, मी डोंबिवलीचा सुशिक्षित सभ्य नागरीक आहे. मी महापालिकेला टॅक्स भरतो. परंतू चालण्यासाठी मला रस्ता मोकळा नाही. फूटपाथ नाही. जो रस्ता आहे. त्यावर फेरीवाले बसले आहेत. जेव्हा मी त्यांची तक्रार करतो. त्यांच्याकडून मला मारहाण केली जाते. ही गुंडागर्दी कधी थांबणार आहे? पोलिस आणि महापालिका काय करते ? असा संतप्त सवाल सुधीर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गीते सांगितले की, या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ््या फेरीवाल्यांचा शोध सुरु आहे. त्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल. दोन महिन्यापूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका मराठी तरुणाला फेरीवाल्यानी मारहाण केली होती. त्या आधी डोंबिवलीत एका रुग्णवाहिकेच्या चालकास फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. त्या पाठोपाठ आज डोंबिवलीतील तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.