कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला आनंद, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 02:33 PM2023-04-02T14:33:27+5:302023-04-02T14:35:23+5:30

कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

anganwadi workers in kalyan rural expressed their happiness | कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला आनंद, कारण...

कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला आनंद, कारण...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क: कल्याणकल्याण  डोंबिवली शहराला लागून असलेले 27  गावांचा तिढा अजूनही सुटला नाही..मात्र कल्याण ग्रामीणमधील अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे...कारण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास 80 अंगणवाड्यांचे शहरात विलीनीकरण झाले आहे..यासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  माजी उपमहापौर तथा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पाठपुरावा केला होता..या पाठपुराव्याला यश मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी भोईर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. 

कल्याण ग्रामीण मधील 80 आंगणवाड्या या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत होत्या.2016 पासून या अंगणवाड्यांचे शहरी भागात   विलीनीकरण व्हावे यासाठी  मोरेश्वर भोईर हे प्रयत्न करत होते. या सर्व अंगणवाड्या शहरी भागात विलीन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तसा जीआरही काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने सेविकांच मानधन व इतर समस्यां मार्गी लागण्याची  आशा निर्माण झाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांचा सर्व कारभार चालणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: anganwadi workers in kalyan rural expressed their happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण