अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी १४ ते १६ मे रोजी टपाली मतदानाची व्यवस्था
By मुरलीधर भवार | Published: May 9, 2024 07:36 PM2024-05-09T19:36:54+5:302024-05-09T19:38:53+5:30
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.
कल्याण - कल्याण लोकसभा मतदार संघात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी १४, १५ आणि १६ मे रोजी तीन दिवस टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदार संघातील नोंदणीकृत मतदारांपैकी अत्यावश्यक सेवेतील पोलीस अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मत पत्रिकेसाठी नमुना १२ /१२ ड आणि ईडीसी कार्यप्रमाण पत्राकरीता नमुना १२ अ मध्ये अर्ज केला होता. जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत. अशा १२ अ च्या पात्र कर्मचाऱ्यांना ईडीसी प्रमाणपत्र वितरण करणे.
नमुना १२ अ/ नमुना १२ ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरीत करुन टपाली मत पत्रिकांच्या मतदानाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर "बॅडमिंटन हॉल, पुरुषांची जीम तळमजला, डोंबिवली क्रीडा संकुलातील जलतरण तलावासमोर टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ मे रोजी दरम्यान सलग तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत उपलब्ध आहे. मतदान प्रक्रीयेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.