कल्याण पूर्वेत बिबट्यानंतर कोल्ह्याचे आगमन
By सचिन सागरे | Published: December 3, 2023 06:39 PM2023-12-03T18:39:33+5:302023-12-03T18:39:51+5:30
काही महिन्यांपूर्वी पूर्वेत बिबट्याने धुमशान घातले होते.
कल्याण: पूर्वेतील विठ्ठलवाडी साईनगर परिसरात कोल्हा आल्याने नागरी भागात वन प्राण्यांच्या वावराच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी पूर्वेत बिबट्याने धुमशान घातले होते. त्यामध्ये एकाचा जीव गेला होता. तर दोन जणांना जखमी केले होते. वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.
विठ्ठलवाडी येथील साईनगर परिसरात रात्रीच्या वेळेस कोल्हाचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोल्ह्यास पकडण्यासाठी वनविभागाने सापाळा लावला आहे. सीसीटीव्हीमार्फत त्याच्या हालचालीवर वनविभागाचे लक्ष असून वनविभागाचे पथक कार्यरत आहे. अशी माहिती वन आधिकारी रघुनाथ चन्ने यांनी दिली. मंलगपट्टा डोंगर रांगातील वन्यप्राणी हे लगतच्या नागरी भागात दिसत असल्याने लोकांनी रात्रीच्या वेळेस दक्षता घेणे गरजेचे आहे.