भाजपाला गळती लागल्याने आमदारांचे मानसिक संतुलन बिघडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 05:20 PM2022-02-18T17:20:30+5:302022-02-18T17:20:42+5:30

शिवसेना माजी नगरसेवकाचा भाजप आमदारावर पलटवार

As the BJP started slipping, the mental balance of the MLAs deteriorated | भाजपाला गळती लागल्याने आमदारांचे मानसिक संतुलन बिघडले 

भाजपाला गळती लागल्याने आमदारांचे मानसिक संतुलन बिघडले 

Next

कल्याण- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यावर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी टिका करताना ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टिका केली होती. त्यांच्या टिकेला प्रतिउत्तर देताना शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी भाजपला गळती लागल्याने भाजप आमदारांचेच मानसिक संतुलन बिघडले असल्याचा पलटवार केला आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी कोटय़ावधीचा निधी मंजू केला आहे. त्याचबरोबर कल्याण लोकसभेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकास कामाचा सपाटा लावला आहे. मंजूर होणारा निधी आणि प्रत्यक्षात येत असलेली विकास कामे पाहून भाजप आमदारांचे डोळे दिपले आहे. त्याचबरोबर खासदारांच्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन आत्ता र्पयत भाजपचे आठ नगरसेवक शिवसेनेत आले आहे.

निवडणूकीच्या तोंडावर भाजपला लागलेली गळती पाहून भाजप आमदारांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टिका म्हात्रे यांनी केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजप आमदारांनी केलेल्या टिकेचा शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करीत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. काल पार पडलेल्या विकास कामांचा शुभारंभाचा कार्यक्रम पाहता निवडणूकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपासह राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हेच यावरुन उघड होत आहे. 

Web Title: As the BJP started slipping, the mental balance of the MLAs deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.