उल्हासनगरात मैदान नसल्याने, सभा घ्यायची कुठे? राजकीय पक्षाला प्रश्न, मुख्यमंत्री योगी यांच्या सभेवर प्रश्नचिन्हे
By सदानंद नाईक | Published: November 6, 2024 10:37 PM2024-11-06T22:37:03+5:302024-11-06T22:37:42+5:30
शहरातील खुल्या जागा, मैदाने व उद्यानावर भुमाफीया अतिक्रमण करीत आहेत. हा प्रकार लपून राहिला नाही.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील एकमेव गोलमैदान १५ नोव्हेंबर पर्यंत महापालिकेने सत्संगसाठी भाड्याने दिल्याने, निवडणूक काळात राजकीय नेत्यांची सभा घ्यायची कुठे? असा प्रश्न राजकीय पक्षा समोर उभा ठाकला. मुख्यमंत्री आदिनाथ योगी यांच्या सभेसाठी मैदान उपलब्ध नसल्याने, त्यांच्या सभेवर प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे.
उल्हासनगर पश्चिमेतील कॅम्प नं-३ मध्ये गोलमैदान, दसरा मैदान व एक खाजगी संच्यूरी मैदान उपलब्ध होते. त्यापैकी दसरा मैदान इतिहास जमा झाले. तर गोलमैदान एका सत्संग कार्यक्रमाला १५ नोव्हेंबर पर्यंत भाड्याने दिले. संच्यूरी मैदानासाठी एका खाजगी व्यक्तीकडून परवानगी घ्यावी लागते. शहर पूर्वेतील व्हिटीसी मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडा संकुल उभे राहत असल्याने, हे मैदान इतिहास जमा झाले. तर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदान येथे क्वचित सभा घेतल्या जातात. उल्हासनगर मतदारसंघात मोठ्या नेत्यांची सभा घ्यायची असल्यास मैदानाच उपलब्ध नसल्याचे उघड झाले. भाजपला उतरप्रदेशचे मुख्यमंत्री आदिनाथ योगी यांची सभा घ्यायची आहे. मात्र मोठे मैदान उपलब्ध नसल्याने, भाजपा नेत्या पुढे प्रश्न उभा ठाकला असून अंटेलिया येथील हॉल मध्ये सभा घेण्याची चर्चा स्थानिक नेत्यात आहे.
शहरातील खुल्या जागा, मैदाने व उद्यानावर भुमाफीया अतिक्रमण करीत आहेत. हा प्रकार लपून राहिला नाही. मात्र शहरांत एकादे मोठे मैदान उपलब्ध नसावे. हे शहरांची दुर्दशा आहे. अशी टीका सर्वस्तरातून होत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या गुरुवारी शहरांत येत आहेत. त्यांची सभा मोकळ्या मैदाना ऐवजी टाऊन हॉल मध्ये होणार आहे. बुधवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत शहरांत ऐकादे मोठे मैदान असावे, अशी भावना शिंदेसेनेचे नेते गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केली. तसेच गोलमैदानातील ७० टक्के भागावर होळी्बॉल, योगाकेंद्र, ब्रम्हकुमारी आश्रम व मिडलटाऊन हॉल उभारण्यात आले आहे. फक्त ३० टक्के भाग मैदानाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मैदानाचा विषय गाजणार आहे.