डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान

By अनिकेत घमंडी | Published: September 7, 2023 10:19 PM2023-09-07T22:19:05+5:302023-09-07T22:20:03+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ वर्ष निमित्त मोदींची नवलाई या संकल्पनेवर आधारित हा उत्सव होता.

Ashtavinayak Govinda team honored at Modi's Navlai Dahihandi festival in Dombivli | डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान

डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान

googlenewsNext

डोंबिवली : शहरातील मानाची समजली जाणार्या भाजपच्या दहीहंडीमध्ये दिवसभरात सुमारे ८० हून अधिक पथकांनी हजेरी लावली. त्यामध्ये नवयुग, ओंम साई, साई एकविरा नवयुग, अष्टविनायक पथकांना हंडी फोडण्यासाठी मान मिळाला होता. त्यापैकी लॉटरी पद्धतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चिठ्ठी काढून अष्टविनायक गोविंदा पथकाला भाजपच्या दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ वर्ष निमित्त मोदींची नवलाई या संकल्पनेवर आधारित हा उत्सव होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा उत्सव केला जातो. शेकडो गोविंदा पथकांनी तो उत्सव साजरा।केला, बाजीप्रभू चौकात हा सोहळा संपन्न झाला, देशभरातून विविध कलाकार त्या ठिकाणी आले होते. भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी सर्व त्या उत्सवाला उपस्थित होते. नवयुग, ओंम साई, साई एकविरा नवयुग, अष्टविनायक पथकांना भाजपच्या दहीहंडीचा मान मिळाला त्यापैकी एका पथकाला लॉटरी पद्धतीने हंडीचा मान मिळणार होता. रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते आकर्षक।ट्रॉफी, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार होते. अत्यन्त।शिस्तबद्ध वातावरणात उत्सव पार पडला, सकाळी ११ वाजेपासून हा सोहळा सुरू झाला. गाणी, जल्लोष, जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देऊन आसमंत दणाणून गेला होता. रात्री १० वाजता लॉटरी काढून हंडी फोडण्यात आली. पाच थर लावण्यात आले होते, सगळ्याच सहभागी पथकांना शेवटच्या थरातील दोन गोविंदा ना संरक्षक बेल्ट लावण्यात आले होते. तसेच सर्व।गोविंदा पथकांचा राज्यस्तरीय विमा काढण्यात आला होता.
 

Web Title: Ashtavinayak Govinda team honored at Modi's Navlai Dahihandi festival in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.