कल्याण- मलंगगड रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात; केडीएमसी आयुक्तांनी रस्त्याच्या कामासाठी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 07:05 PM2021-03-21T19:05:33+5:302021-03-21T19:05:42+5:30

कल्याण: कल्याण मलंगगड रोड वरील द्वारली गावाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. सततचे रस्त्यावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी ...

Asphalting of Kalyan-Malanggad road started; KDMC Commissioner took initiative for road work | कल्याण- मलंगगड रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात; केडीएमसी आयुक्तांनी रस्त्याच्या कामासाठी घेतला पुढाकार

कल्याण- मलंगगड रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात; केडीएमसी आयुक्तांनी रस्त्याच्या कामासाठी घेतला पुढाकार

googlenewsNext

कल्याण: कल्याण मलंगगड रोड वरील द्वारली गावाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. सततचे रस्त्यावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी सह परिसरातील नागरिकांना धुळीचे देखील त्रास होत होता. या ठिकाणी खड्डे बुजवायला  पालिका प्रशासनाने सुरवात केली होती मात्र यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली गेली .  लोकमतनेही याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर या रस्त्याच्या डांबरीकरणालाच  प्रशासनाने सुरवात केली असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.

पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी रस्ता रोकोचा इशारा दिला होता. अखेर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश दिले. पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी  कामगारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर महापालिका आयुक्तांचे देखील आभार मानले आहे.

Web Title: Asphalting of Kalyan-Malanggad road started; KDMC Commissioner took initiative for road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.