वयाच्या ५१ व्या वर्षी छाया यांचे १० वी च्या परीक्षेत घवघवीत यश, 66 टक्के गुण मिळवत दहावी सर
By सचिन सागरे | Published: May 28, 2024 01:31 PM2024-05-28T13:31:37+5:302024-05-28T13:32:03+5:30
कमी वयात लग्न झाले असल्याने त्यांना १० वी पास होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. परंतु तब्बल ३५ वर्षानंतर छाया यांनी पुन्हा मुबंई येथील व्ही.एस.एम. भायखळा नाईट हायस्कूल येथे ऍडमिशन घेत. जिद्दीने दिवस रात्र अभ्यास केला. कोणतेही खाजगी क्लासेस न लावता शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम नियमिय करत १० वीच्या परीक्षेत ६६.२० टक्के गुण मिळवले आहेत.
डोंबिवली : येथे राहणाऱ्या छाया वाघमारे यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी १० वीच्या परीक्षेत ६६.२० टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे. आपल्या कुटूंबाचा गाढा ओढत छाया यांनी जिद्दीने १० वी पास होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
कमी वयात लग्न झाले असल्याने त्यांना १० वी पास होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. परंतु तब्बल ३५ वर्षानंतर छाया यांनी पुन्हा मुबंई येथील व्ही.एस.एम. भायखळा नाईट हायस्कूल येथे ऍडमिशन घेत. जिद्दीने दिवस रात्र अभ्यास केला. कोणतेही खाजगी क्लासेस न लावता शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम नियमिय करत १० वीच्या परीक्षेत ६६.२० टक्के गुण मिळवले आहेत.
परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मला खूप आनंद आहे. शाळेतील मुख्याध्यापक आनंद पाटील, त्याचसोबत सुरेश काळे, कदम, गटरी, मासुम ट्रस्टचे खर्डे, कविता गीते या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच मला १० वीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता आल्याचे छाया यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मागच्या वर्षी छाया यांनी नर्सिंगची परीक्षा देत त्या उत्तीर्ण झाल्या. यापुढेही अजून शिकायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. छाया यांना १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे.