आंबिवली इराणी वस्तीत पोलिसावरील हल्ला प्रकरण, १८ जणांविरोधात गुन्हा दाखल
By मुरलीधर भवार | Published: November 10, 2023 07:49 PM2023-11-10T19:49:47+5:302023-11-10T19:50:20+5:30
पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
कल्याण- कल्याणनजीक असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर इराणी वस्तीतील महिला पुरुषांनी प्रतिकार करुन पोलिसांवर दगडफेक केली. तसेच आरोपींना पळवून लावले. पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी १९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अंधेरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात पाहिजे असलेले आरोपी हे आंबिवली इराणी वस्तीत लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. अंधेरी पोलिसांच्या पथकासह खडकपाडा पोलिस यांनी संयुक्त रित्या कारवाई करण्यासाठी आंबिवली वस्ती गाठली. ही वेळ होती मध्यरात्री २ वाजताची. त्याठीकाणी आरोपी हसन इराणी, अबास इराणी तालिम इराणी, मोहम्मद आजिज इराणी, माेहम्मद नासिर इराणी हे दिवाळीत नागरीकांनी किंमती वस्तू, सोने चांदी खरेदी केले आहे. त्याठिकाणी दरोडा कसा टाकायचा आणि चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावून त्याची आर्थिक वाटणी कशा प्रकारे करायची याचा कट रचत होते.
पोलिस पथक पोहचताच इराणी वस्तीतील चोरट्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक करुन आरोपींच्या अटकेच मज्जाव केला. या दगडफेकीत दहा पोलिस जखमी झाले. तसेच पोलिसांची गाडीची काच फुटल्याने गाडीचे नुकसान झाले. या दगडफेकीत आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही घटना इराणी वस्तीत घडली. या प्रकरणी जखमी पोलिस राहूल शिदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अब्बास इराणी, हसन इराणी, रजा इराणी, मुसा इराणी, मोहम्मद अजीज इराणी, मोहम्मद लाला इराणी, मोहम्मद नासिर इराणी, इब्राहिम इराणी तसेच महिला आसिया इराणी, शबा इराणी, बिट्टी इराणी, बेनजीर इराणी, कुब्रा इराणी, रबाब इराणी आणि तालिया इराणी या १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.