रिक्षा पासिंग विलंब दंड; कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
By प्रशांत माने | Published: June 23, 2024 03:54 PM2024-06-23T15:54:53+5:302024-06-23T15:55:16+5:30
फेरविचार करण्याचे परिवहन आयुक्तांना आदेश
कल्याण: केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार रिक्षाचालकांना रिक्षा पासिंग विलंब नित्यरोज पन्नास रुपये दंड आकारणी आरटीओ ने सुरु केली आहे. या विलंब दंडाबाबत फेरविचार करावा याकरीता सरकार दरबारी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने पाठपुरावा चालू होता. रविवारी महासंघाच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेत त्यांच्यासोबर हा मुद्दा मांडला. त्यावेळी शिंदे यांनी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याशी संपर्क साधून दंडाबाबत फेरविचार करण्याचे आदेश दिले.
महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या निर्देशानुसार पदाधिकारी एकनाथ भोईर, विनायक सुर्वे ,संतोष नवले, रविंद्र गायकवाड ,राजु गजमल, सतिश भोसले, विलास वाघ या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यात रिक्षा पासिंग विलबं हजारो रुपये दंड भरण्यास रिक्षाचालक हतबल व असमर्थ आहेत. पासिंग विलंब दंडाबाबत फेरविचार करावा अशी मागणी शिष्टमंडळाने शिंदे यांच्याकडे केली. रिक्षा पासिंग विलंब दंड बाबतीत लक्ष घालून दिलासा दिल्याबद्दल तसेच रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापित केले याबद्दल महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. परिवहन आयुक्त यांचे पासिंग विलंब दंड आकारणी ७ मे २०२४ रोजी चे जारी परिपञकानुसार ७ मे पासून रिक्षा पांसिग विलबं दंड घेण्यात येणार आहे. एक दोन वर्ष किंवा आधिक दिवस रिक्षा पासिंग विलंब असलेल्या रिक्षा चालकांना मुख्यमंत्र्यांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती महासंघाचे सचिव विनायक सुर्वे यांनी दिली.