डोंबिवलीतील कैवल्यवारीत 'अवघा रंग एक झाला', रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 11:31 AM2023-05-02T11:31:06+5:302023-05-02T11:32:04+5:30

सावित्रीबाई फुले नाट्यगृहात जमलेला रसिक विठ्ठल भक्तीमध्ये चिंब भिजला होता. 

'Avgha Rang Ek Zala' at Kaivalyavari in Dombivli, spontaneous response of fans | डोंबिवलीतील कैवल्यवारीत 'अवघा रंग एक झाला', रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवलीतील कैवल्यवारीत 'अवघा रंग एक झाला', रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

डोंबिवली : आषाढीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कैवल्यवारी’ या वारीच्या प्रवासावर आधारित भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात जमलेला रसिक विठ्ठल भक्तीमध्ये चिंब भिजला होता. 

या कार्यक्रमात पंडित आनंद भाटे यांनी दिवेघाटाचे वर्णन करणारे 'चालू सोबतीने वाट चढू,अवघड दिवघाट', यासोबतच 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' हे गीत सादर केले. सावनी शेंडे यांनीहीअतिशय बहारदार गायन करत 'अवघा रंग एक झाला' या गाण्यातून मैफिलीत रंग भरला. याशिवाय विलास कुलकर्णी आणि अवधूत गांधी यांनी गायलेल्या 'कानडा राजा पंढरीचा' या गाण्याने रसिकांची मने जिंकली. 

यासोबतच विलास कुलकर्णी यांनी कैवल्यवारी या अल्बम मधील 'येतो परतुनी देवा, माझी आठवण ठेवा' हे विठ्ठल भेटीनंतर त्याचा निरोप घेतानाचे गीत सादर केले. कार्तिकी गायकवाड हिने गवळण आणि काही संत रचना सादर करुन रसिकांची दाद मिळवली.  तसेच, या कार्यक्रमात डॉ. वृषाली दाबके आणि त्यांच्या शिष्यांनी मिळून कैवल्यवारीतील काही गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर केले. 

या नृत्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कैवल्यवारीतील सर्व गाणी वर्षा राजेंद्र हुंजे यांनी लिहिली आहेत. याच कार्यक्रमात चित्रकार उमेश पांचाळ यांनी एकीकडे भक्तिगीते सादर होताना त्याचवेळी विठ्ठलाचे अप्रतिम लाइव्ह पेंटिंग काढले. कैवल्यवारीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी ११ प्रयोग करण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले.
 

Web Title: 'Avgha Rang Ek Zala' at Kaivalyavari in Dombivli, spontaneous response of fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.