धातुमिश्रित मांजाचा वापर टाळा, वीजतारांपासून दूर राहा, पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन

By अनिकेत घमंडी | Published: January 12, 2024 05:23 PM2024-01-12T17:23:09+5:302024-01-12T17:23:59+5:30

पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Avoid use of metallic mats, stay away from electric wires, Mahavitrihan appeals to take precautions while flying kites | धातुमिश्रित मांजाचा वापर टाळा, वीजतारांपासून दूर राहा, पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन

धातुमिश्रित मांजाचा वापर टाळा, वीजतारांपासून दूर राहा, पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन

डोंबिवली - तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या या वीज वितरण यंत्रणांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागात वीज वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे सुदूर पसरलेले आहे. दुर्घटना व अपघात टाळण्यासाठी पतंग उडवताना या यंत्रणेपासून दूर राहून मोकळ्या मैदानांचा वापर करावा. वीजवाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. कारण विद्युत वाहिन्यांच्या परस्पर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते. घराच्या गच्चीवरून, रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. वीजवाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकू नये. धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा. कारण धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात वीज प्रवाहीत होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा; जेणेकरून तात्काळ वीजपुरवठा खंडित करून तातडीची मदत करणे सोईचे होईल. महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्राच्या १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Avoid use of metallic mats, stay away from electric wires, Mahavitrihan appeals to take precautions while flying kites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.