कल्याणात फ्लॅशमॉब! रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

By सचिन सागरे | Published: October 22, 2023 03:09 PM2023-10-22T15:09:24+5:302023-10-22T15:10:17+5:30

केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजचा पुढाकार

Awareness about mental health through Flashmob - Rally in Kalyan | कल्याणात फ्लॅशमॉब! रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

कल्याणात फ्लॅशमॉब! रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

सचिन सागरे

कल्याण : सध्या जगभरात मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला जात असून त्यानिमित्ताने कल्याण पहिल्यांदाच फ्लॅश मॉब आणि रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आले. कल्याणातील केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेजच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.

कल्याण पश्चिम येथील केंब्रिया इंटरनॅशनलपासून सुरू झालेली ही रॅली खडकपाडा मेन रोड,अमृत पार्क, वसंत व्हॅली, गोदरेज हिलमार्गे साई चौकात समाप्त झाली. त्यानंतर या रॅलीमध्ये उपस्थित असणाऱ्या केंब्रिया कॉलेजच्या सायक्लॉजी विभागातील ११ आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केल्याचे दिसून आले. मानसिक आरोग्याबाबत विविध सकारात्मक संदेश देणारे फलक यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते.

आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असलो तरी त्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे त्याला तितके महत्त्व दिले जात नाही. आपल्या शरीराला ताप आला तर आपण लगेचच डॉक्टरकडे जातो. परंतु मनाला त्रास होत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही गोष्ट बदलण्यासाठी आम्ही आज हा उपक्रम राबवल्याची माहिती शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सी एम डी बिपिन पोटे यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजच्या मुख्याध्यापिका हिना फाळके, सायक्लॉजी विभाग प्रमुख क्रिपा राठोड, भूषण कुटे, अमोल शिंदे यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

 

Web Title: Awareness about mental health through Flashmob - Rally in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.