महिला रेल्वे प्रवाशांमध्ये नवीन फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती
By अनिकेत घमंडी | Published: May 18, 2024 05:51 PM2024-05-18T17:51:39+5:302024-05-18T17:52:12+5:30
डोंबिवली: लोहमार्ग पोलीस आयुक्त मुंबई, यांच्या संकल्पनेतून शनिवारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत कल्याण, टिटवाळा रेल्वे स्थानकावर, महिलांच्या राखीव ...
डोंबिवली: लोहमार्ग पोलीस आयुक्त मुंबई, यांच्या संकल्पनेतून शनिवारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत कल्याण, टिटवाळा रेल्वे स्थानकावर, महिलांच्या राखीव डब्या समोर महिला प्रवाशांना महीला सुरक्षा जनजागृती अंतर्गत नवीन प्रमुख फौजदारी कायदे अंतर्गत हक्क व संरक्षण या बाबत जनजागृती करण्यात आली.
महिलांसंबंधित सुधारित कायदे व कलम याबाबदची उपयुक्त माहिती महिला रेल्वे प्रवाशांना देण्यात आली. ही मोहीम राबविण्यात आली. तसेच महिला प्रवाशांना प्रवासात काही अनुचित प्रकार घडल्यास *रेल्वे पोलीस हेल्पलाईन नंबर १५१२ क्रमांकावर संपर्क करावा. असे सूचित करण्यात आले. त्या मोहिमेत ९० महिला प्रवासी/ विद्यार्थिनी तसेच रेल्वे प्रवाशांना कायद्याबाबत माहिती दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.