न्यायालय इतरत्र हलविण्यास वकील संघटनेचा विरोध; उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

By प्रशांत माने | Published: October 29, 2023 04:58 PM2023-10-29T16:58:16+5:302023-10-29T16:58:45+5:30

कल्याण रेल्वे स्थानक नजीक असलेले जिल्हा व सत्र न्यायालय अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास कल्याण जिल्हा न्यायालय वकील या संघटनेने विरोध दर्शविला आहे.

Bar association opposition to relocation of court Petition filed in High Court |  न्यायालय इतरत्र हलविण्यास वकील संघटनेचा विरोध; उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

 न्यायालय इतरत्र हलविण्यास वकील संघटनेचा विरोध; उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक नजीक असलेले जिल्हा व सत्र न्यायालय अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास कल्याण जिल्हा न्यायालय वकील या संघटनेने विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत याबाबतचा पत्रव्यवहार केल्यानंतर आता संघटनेच्या वतीने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत न्यायालयाच्या इमारतींचा पुनर्विकास सध्याच्या जागेत आहे त्याच ठिकाणी करण्याची विनंती केली गेली आहे.

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय पश्चिमेकडील बारावे येथील जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू ती जागा सोयीची नाही याकडे वकील संघटनेने लक्ष वेधले आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापुर या पाच तालुक्यांसाठी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय आहे. कल्याण रेल्वे स्थानक आणि बस स्थानकालगत न्यायालय असणे हे पक्षकार, वकील, न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचा-यांसाठी सोईस्कर आहे. न्यायालयात येण्याचा प्रवास खर्च परवडणारा असून याठिकाणी वेळेवर पोहोचता येते. त्यामुळे सध्या ज्याठिकाणी न्यायालय आहे त्या जागेमध्येच न्यायालयांच्या इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या स्थलांतराला शंभर टक्के वकिलांचा विरोध, त्याचबरोबर पक्षकार आणि कल्याणमधील नागरिकांचा सुध्दा विरोध असल्याने स्थलांतर लोकहिताचे नाही व लोकशाहीला धरून होणार नाही याकडे वकील संघटनेने लक्ष वेधले आहे. महिला कर्मचारी, महिला वकील भगिनी यांच्यासाठी न्यायालयाची सध्याची जागा सुरक्षित आहे त्यामुळे याच ठिकाणी इमारतींचा पुर्नविकास करावा अशी अशी मागणी संघटनेने केली आहे. न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. सोमवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅड प्रकाश जगताप यांनी दिली.

Web Title: Bar association opposition to relocation of court Petition filed in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण