"शहराचे सुशोभीकरण सुरू आहे, होर्डिंग लावून बकाल करू नका"

By मुरलीधर भवार | Published: October 18, 2023 03:42 PM2023-10-18T15:42:30+5:302023-10-18T15:43:37+5:30

भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्षांचे सर्व पक्षांना आवाहन

Beautification of the city is going on, don't be fooled by putting up hoardings bjp youth president | "शहराचे सुशोभीकरण सुरू आहे, होर्डिंग लावून बकाल करू नका"

"शहराचे सुशोभीकरण सुरू आहे, होर्डिंग लावून बकाल करू नका"

कल्याण- शहराचे सुशोभीकरण सुरू आहे, होर्डिंग लावून बकाल करू नका असे,आवाहन भाजपा युवा मोर्चाचे कल्याण जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी सर्व राजकीय पक्षांना केले आहे. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची नुकतीच भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, शहरात सुशोभीकरणाअंतर्गत स्ट्रीट लाईटवर तिरंगा लाइटिंग करण्यात आलेली आहे .मात्र या स्ट्रीट लाईटवर अनेकदा बॅनर लावले जातात. त्यामुळे शहरात बकालपणा दिसून येतो. 

भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष वैभव गायकवाड यांनी याबाबत खंत व्यक्त केली. शहरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, काहीतरी चांगले दिसत आहे. त्यावर बॅनर लावून शहर बकाल करू नका असे आवाहन वैभव गायकवाड यांनी सर्व पक्षाना केले .तसेच ही सुरुवात माझ्या पक्षाच्या पक्षापासून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैभव गायकवाड हे भावी महापौर पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . याबाबत वैभव गायकवाड यांना विचारले असता त्यांनी अजून तसा विचार झालेला नाही. मात्र पक्षाने जर जबाबदारी दिली तर मी ती घेणार असे सांगितले. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढते. ती दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवून व्यसनमुक्तीचे शिबीर आयोजित करणार त्याचबरोबर बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी विविध कंपनी मालग आणि कामगार संघटनांशी बोलून रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम केले जाईल. भाजप सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कशा पोहचतील. त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गायकवाड यांनी सांंगितले.

Web Title: Beautification of the city is going on, don't be fooled by putting up hoardings bjp youth president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.