सोलर रुफटॉप’ योजनेतून स्वत:च व्हा वीजनिर्माते 

By अनिकेत घमंडी | Published: November 18, 2022 06:00 PM2022-11-18T18:00:22+5:302022-11-18T18:00:50+5:30

योजनेतील सहभाग वाढीसाठी कल्याण परिमंडलात जनजागृतीपर मेळावे 

Become a power producer yourself with the Solar Rooftop scheme dombivali | सोलर रुफटॉप’ योजनेतून स्वत:च व्हा वीजनिर्माते 

सोलर रुफटॉप’ योजनेतून स्वत:च व्हा वीजनिर्माते 

googlenewsNext

डोंबिवली: केंद्र सरकारचे नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘सोलर रुफटॉप’ योजना (एमएनआरई-2) राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारून स्वत: वीजनिर्मिती करून तिचा वापर करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी महावितरणच्या कल्याण परिमंडलात मेळाव्यांचे आयोजन करून शुक्रवारपासून जनजागृती करण्यात येत आहे.

केंद्र सरकारकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी अनुदान देण्यात येते. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतू प्रत्येक घरासाठी १० किलोवॅटच्या मर्यादेसह रहिवासी गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना वर्गवारीतील ग्राहकांना २० टक्के अनुदानाची तरतुद आहे. कल्याण परिमंडलात योजनेच्या माध्यमातून २२ जणांनी तर अनुदाना व्यतिरिक्त १ हजार ८४४ ग्राहकांनी सोलर रुफ टॉप यंत्रणा कार्यान्वित केली आहे. विजेचा स्वत:साठी वापर व अतिरिक्त विजेची विक्री अशी सोलर रुफ टॉप योजनेची संकल्पना आहे. त्यासाठी उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आदी ग्राहक अर्ज करू शकतात. यात केवळ घरगुती ग्राहकांसाठी अनुदानाची तरतूद आहे.

योजनेच्या लाभासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर लॉगीन करून आवश्यक माहितीचा तपशील भरता येतो. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची निवडही लाभार्थ्यान्याच करावयाची आहे. या सर्व सुविधा ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या पोर्टलवरही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. या योजनेच्या कामांसाठी कल्याण परिमंडलात १०२ कंत्राटदार सुचिबद्ध करण्यात आले आहेत. ग्राहकांना वीजबिलात बचत आणि या अतिरिक्त उत्पन्नाची संधी देणाऱ्या या योजनेत अधिकाधिक ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले. 

Web Title: Become a power producer yourself with the Solar Rooftop scheme dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.