दुचाकीचालकाची निर्दोष मुक्तता; अपघात प्रकरणी २०१२ मध्ये झाला होता गुन्हा
By सचिन सागरे | Updated: May 18, 2024 16:11 IST2024-05-18T16:11:35+5:302024-05-18T16:11:41+5:30
भगवानच्या वतीने वकील तृप्ती पाटील यांच्यासह वकील विद्या रसाळ व वकील रश्मी पेंडसे यांनी काम पाहिले.

दुचाकीचालकाची निर्दोष मुक्तता; अपघात प्रकरणी २०१२ मध्ये झाला होता गुन्हा
कल्याण : बेजबाबदारपणे दुचाकी चालवून अपघात केल्याच्या गुन्ह्यातून भगवान चिमण पिंगळे (४०, रा. दहागाव, टिटवाळा) याची कल्याण न्यायदंडाधिकारी पी. एस. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली.
कल्याण तालुका (टिटवाळा) पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन चालविल्याप्रकरणी भगवान याच्यावर सन २०१२ मध्ये मोटार वाहन कायदा कलमासह अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. याप्रकरणी अटकेत असलेल्या भगवानची नंतर जामिनावर मुक्तता केली होती. या खटल्यात तिसरे न्यायालयात सुनावणी होऊन साक्षीदार तपासले. भगवानविरोधात सबळ पुरावे सापडले नाही. भगवानच्या वतीने वकील तृप्ती पाटील यांच्यासह वकील विद्या रसाळ व वकील रश्मी पेंडसे यांनी काम पाहिले.