भिवंडीत स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने भामट्याकडून साडे १७ लाखांची फसवणूक

By नितीन पंडित | Published: January 1, 2024 08:26 PM2024-01-01T20:26:29+5:302024-01-01T20:27:17+5:30

वसीम अहमद हसनैन शाह रा.शांतीनगर असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव असून त्याने नागरिकांना स्वस्तात घर देत असल्याची बतावणी केली होती.

Bhamtya committed a fraud of seventeen and a half lakhs on the pretext of giving a cheap house in Bhiwandi | भिवंडीत स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने भामट्याकडून साडे १७ लाखांची फसवणूक

भिवंडीत स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने भामट्याकडून साडे १७ लाखांची फसवणूक

भिवंडी: स्वस्तात घर देत असल्याची बतावणी करून एका भामट्याने महिलेसह इतर पाच ते सहा नागरिकांना साडे सतरा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रविवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

वसीम अहमद हसनैन शाह रा.शांतीनगर असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव असून त्याने नागरिकांना स्वस्तात घर देत असल्याची बतावणी केली होती. त्याच्या या भूलथापांना बळी पडून शहरातील धुणी भांडी करणारी महिला रेशमा इसराइल खान हिने दोन लाख रुपये दिले होते. त्यावेळी भामटा वसीम याने रेश्मा हिस स्वस्तात घर देत असल्याची बतावणी केली होती. याच वेळेस भामट्या वसीम याने इतरही पाच लोकांकडून १५ लाख ५० हजार रुपये घेतले होते. या सहा जणांकडून सुमारे साडे सतरा लाख रुपये वसीम यांनी घेत या नागरिकांना कोणतेही घर न देता त्या सर्वांची फसवणूक केली आहे.याप्रकरणी रेश्मा खान यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शांतीनगर पोलिसांनी भामटा वसीम यास अटक केली आहे.

Web Title: Bhamtya committed a fraud of seventeen and a half lakhs on the pretext of giving a cheap house in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.