भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार म्हाडा इमारतींचा ताबा

By मुरलीधर भवार | Published: November 4, 2023 05:35 PM2023-11-04T17:35:38+5:302023-11-04T17:36:02+5:30

प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही.

Bhandarli Uttarshiv Gotheghar villagers will take over the Mhada buildings | भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार म्हाडा इमारतींचा ताबा

भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार म्हाडा इमारतींचा ताबा

कल्याण- राज्य सरकारने गावच्या विकासासाठी राखीव ठवेलेल्या गायरान जमिनीवर म्हाडाने इमारती उभारल्या असून गावच्या आरक्षित जागेवर बांधलेल्या इमारतींचा ताबा ७ नोव्हेंबर रोजी भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थ घेणार असल्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांनी दिला आहे.

भंडार्ली गोठेघर गाव आणि रजिया मार्केट या आरक्षित जागेवर म्हाडा तर्फे खाजगी विकासकाने ग्रामपंचायत आणि इतर कोणतीही परवानगी न घेता इमारतीचा बांधल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून ही जागा गावच्या विकासासाठी, शाळा बांधण्यासाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी वापरण्याची ग्रामस्थांची मागणी होती. अनेक मोर्चे आंदोलने करून सुद्धा ही जागा मिळत नसल्याने या ग्रामस्थांनी प्रांत, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला.

या प्रकरणी प्रांत अधिकाऱ्यांनी ६ सप्टेंबर रोजी नागरिकांना न्याय देण्याचे तोंडी आश्वासन दिले असताना आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. येत्या मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी हे ग्रामस्थ म्हाडाच्या इमारतींचा ताबा घेणार इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Bhandarli Uttarshiv Gotheghar villagers will take over the Mhada buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण