भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून सरत्या वर्षाला निरोप देताना १८२ गुन्ह्यांची नोंद
By नितीन पंडित | Published: January 1, 2024 08:33 PM2024-01-01T20:33:46+5:302024-01-01T20:34:33+5:30
१८२ गुन्ह्यांची नोंद करीत ५६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
भिवंडी: सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करताना मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यां विरोधात भिवंडीत वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदी कारवाईत तब्बल १८२ गुन्ह्यांची नोंद करीत ५६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
भिवंडी वाहतूक विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी १७ जणांविरोधात वाहतूक कायदा कलम १८५ प्रमाणे तर दारू पिऊन दुचाकी वाहन चालवणाऱ्या चालकाच्या मागे बसलेल्या दोघा जणां विरोधात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर ७९ वाहन चालकां विरोधात ५६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.तर कोनगाव वाहतूक पोलीस शाखेने कलम १८५ नुसार १६ तर कलम १८८ नुसार ११ अशा एकूण २७ जणांविरोधात कारवाई केली आहे.तर नारपोली वाहतूक शाखेने ५७ मद्यपी वाहन चालकां विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.