मोठी बातमी: डोंबिवली-ठाकुर्ली जलद मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने स्फोटासारखा आवाज; लोकल सेवा ठप्प
By अनिकेत घमंडी | Updated: August 5, 2024 16:15 IST2024-08-05T16:14:51+5:302024-08-05T16:15:19+5:30
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी: डोंबिवली-ठाकुर्ली जलद मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने स्फोटासारखा आवाज; लोकल सेवा ठप्प
अनिकेत घमंडी/ डोंबिवली
डोंबिवली: ओव्हर हेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना सोमवारी डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर घडली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ओएचईच्या दुर्घटना वारंवार घडत असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो, रेल्वेने असे अपघात टाळण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी अशी मागणी के३ ( कल्याण कर्जत कसारा) प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली. कधी मालगाडी तर कधी लोकल सेवा ओव्हरहेड समस्येमुळे बंद पडते, त्याचा त्रास प्रवाशांना होतो. सोमवारीही अचानकपणे अशी घटना घडली, आणि त्यामुळे काही अपरिहार्य कारणामुळे लोकल सेवा बंद असल्याची घोषणा झाली आणि प्रवाशांना नेमके काय झाले हे कळले नाही.
वायर तुटली ट्रॅकवर पडली स्फोटसारखा आवाज आल्याने थांबलेल्या जलद डाऊन मार्गावरील लोकलमधील प्रवासी घाबरल्याचे घनघाव म्हणाले.
०५/०८/२०२४ रोजी १४.५५ वाजता ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान ऑफ स्लो लाईन रेल्वे किलोमीटर नंबर ४९ जवळची ohe वायर बिघाड झाल्याने अप स्लो लाईन स्लो लाईन विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली असून, योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
(किरण उंदरे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे