कल्याण डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ, धनुष्यबाण करणार भाजपाला घायाळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:51 PM2021-11-22T12:51:50+5:302021-11-22T12:52:36+5:30

सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे.

Big political upheaval in Kalyan Dombivali, will BJP be injured? | कल्याण डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ, धनुष्यबाण करणार भाजपाला घायाळ?

कल्याण डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ, धनुष्यबाण करणार भाजपाला घायाळ?

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. कोरोनां काळामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं पुन्हा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने आयराम गयारामांची संख्या देखील वाढणार आहे, हे निश्चित ! डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला ओळखला जातो आणि निवडणूकीच्या तोंडावर हा बालेकिल्ल्या खिळखिळा करण्यासाठी सेनेकडून प्रयत्न सुरू झाला आहे. डोंबिवलीतील भाजपाचे तीन नगरसेवक सेनेत आज प्रवेश करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश मुंबई येथे होणार आहे.
      
सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. कोरोनां काळामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं पुन्हा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच आता डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सुनीता पाटील आणि सायली विचारे हे सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच परिवहन सदस्य संजय राणे, खोणी ग्रामपंचायत सदस्य हनुमान ठोंबरे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील सेनेत प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. पक्ष प्रवेशापुर्वी गाड्यांच्या ताफ्यासह मोठं शक्तिप्रदर्शन देखील केलं जाणार आहे. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्यासह ग्रामीण भागात सेना आपल्या धनुष्यबाणानं कमळाला आज घायाळ करणार आहे. आता, या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीत अधिक राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता आहे.

Web Title: Big political upheaval in Kalyan Dombivali, will BJP be injured?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.