बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप

By प्रशांत माने | Published: October 28, 2022 05:35 PM2022-10-28T17:35:45+5:302022-10-28T17:36:45+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 

Big Scam in Bullet Train Land Acquisition Compensation; Allegation of MNS MLA Raju Patal | बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप

बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप

Next

डोंबिवलीः  केंद्र सरकारचा महत्वाकांशी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन भूसंपादनात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे कल्याण ग्रामीण चे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. त्यांनी आज  ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भूमिपुत्र शेतकऱ्यांसह भेट घेत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. रस्त्यावरील ताडपत्रीच्या घरांना सरकारकडून १४ लाखांचा मोबदला दिला जातोय,अन स्वतःच्या सातबाऱ्याच्या जागेत घर असलेल्या भूमिपुत्रांना सात लाखांचा मोबदला दिला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेला  बुलेट ट्रेन प्रकल्प हा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून जात आहे. त्यामुळे येथील बहुतांश भूमिपुत्रांच्या जमिनी यात बाधित होत आहेत. मात्र या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय दिला जात असल्याने या संदर्भात शेतकऱ्यांनी  आमदार  पाटील यांची भेट घेत आपली कैफियत मांडली  होती. यावर   पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत ठाण्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. या संदर्भात तातडीने बैठक घेऊन कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 या संदर्भात पाटील म्हणाले कि, जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली त्यावेळेस भूधारकांना चांगला मोबदला मिळेल यावर शेतकरी सरकारला जमीन दयायला तयार आले. अश्या वेळेस एक लॉबी तयार झाली ज्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मोठा घोटाळा इथे केलेला आहे. इथे  जिल्हाधिकाऱ्यांकडे मी स्वतः शेतकऱ्यांना घेऊन आलो होतो तिथे शेतकऱ्यांची स्वतःची जागा आहे. स्वतःच्या चाळी आहेत.आरसीसी स्ट्रक्चर आहेत. त्यांना सहा लाखांच्या आसपास मोबदला दिला जातोय  अन शिळफाट्याला बंगाली बाबाची ताडपत्रीची घर होती. त्यानं सरकारी जागेवर ताडपत्रीची घर बांधली त्यांना १४ लाखांचं मोबदला दिला जातोय. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. खरतर केंद्र सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यांना लवकर करायचा असेल तर त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचे महाराष्ट्रातील जे पाठीराखे आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. याच्यात ज्या प्रमाणे घोळ झाला आहे त्या प्रमाणे एसआयटी स्थापन करून या अधिकाऱ्यांना किंवा दलालांना  उघडे पाडले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो होतो त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते आम्हाला न्यायालयात जायच्या आधी बैठक घेतील. सोमवार किंवा मंगळवारी बैठक होईल तेव्हा बघू काय दिलासा मिळतो का ? नाहीतर आम्ही याच्या विरोधात आंदोलन देखील करू,ज्या व्यासपीठावर न्याय मागायचा आहे तिथे न्याय देखील मागू पण आमच्या भूमिपुत्रांना रस्त्यावर येऊ देणार नाही त्यांना त्यांचा योग्य मोबदला घेऊन देणारच अशी प्रतिक्रिया  पाटील यांनी दिली.

Web Title: Big Scam in Bullet Train Land Acquisition Compensation; Allegation of MNS MLA Raju Patal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे