बिर्ला महाविद्यालयाने प्रसिद्ध केले टपाल तिकीट; राजभवनात पार पडला कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 03:25 PM2021-10-15T15:25:06+5:302021-10-15T15:27:02+5:30

Birla College : राज्यपालांच्या हस्ते टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले.

Birla College issues postage stamps; The event was held at Raj Bhavan | बिर्ला महाविद्यालयाने प्रसिद्ध केले टपाल तिकीट; राजभवनात पार पडला कार्यक्रम

बिर्ला महाविद्यालयाने प्रसिद्ध केले टपाल तिकीट; राजभवनात पार पडला कार्यक्रम

googlenewsNext

कल्याण - देशातील प्रतिष्ठीत महाविद्यालयांमध्ये कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयात ५० वर्ष पूर्ण झाल्याने हे महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. तसेच महाविद्यालयाचे संस्थापक वसंतकुमार बिर्ला यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले आहे. यानिमित्त बिर्ला महाविद्यालयाने एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे.

मुंबई राजभवनात आयोजित कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह चीफ पोस्ट जनरल एच. सी. अग्रवाल यांनी वसंत कुमार बिर्ला आणि महाविद्यालयाचे छायाचित्रचे चिन्ह असलेल टपाल तिकीट राज्यपालांना अधिकृत औपचारीकतेसह सादर केले. राज्यपालांच्या हस्ते टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी पद्मभूषण श्रीमती राजश्री बिर्ला यांनी वसंतकुमार बिर्ला यांचे स्मरण करुन महाविद्यालयाच्या पुढील उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ. आर. चितलांगे, शिक्षण संचालक डॉ. नरेशचंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातर्फे अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.
 

Web Title: Birla College issues postage stamps; The event was held at Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण