मुंबईसह सर्व महापालिका भाजपा अन् बाळासाहेबांची शिवसेना जिंकणार; एकनाथ शिंदेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:47 PM2023-02-16T12:47:31+5:302023-02-16T12:48:09+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील विविध विकास कामाचं यावेळी लोकार्पण करण्यात आले.
राज्याच्या डबल इंजिनच्या सरकारला मुंबईसह कल्याण आणि सर्व महापालिकांचे डब्बे जोडले जाणार आणि ही एक्सप्रेस तुफान गतीने धावेल, असं म्हणतं मुंबईसह सगळ्या महापालिका भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या सभेमध्ये बोलून दाखवला.
भगवा तलावाचे सुशोभिकरण आणि मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर आणि बी.एस.यु.पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्पबाधितांना वाटप, अशा विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ शिंदेंनी नागरिकांशी संवाद साधला.
#कल्याण शहरातील #प्रबोधनकार_ठाकरे सरोवर म्हणजेच भगवा तलावाचे सुशोभिकरण आणि मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर आणि बी.एस.यु.पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्पबाधितांना वाटप, अशा विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. pic.twitter.com/KcobT2knCo
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 15, 2023
कल्याणसाठी स्वतंत्र धरणाची जी मागणी होत आहे, त्यासाठी काळू धरणासाठी राज्य सरकारने ४१० कोटींचा निधी फॉरेस्टला दिला असून लवकरच या धरणाची प्रक्रिया देखील पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर, तसेच कल्याणमध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारा राज्य सरकार मदत करेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलावून दाखवला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील विविध विकास कामाचं यावेळी लोकार्पण करण्यात आले.
कल्याण हे ऐतिहासिक शहर असून या शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व येथे दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स उभारावीत यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी मागणी लक्षात घेऊन मेट्रो१२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. चांगल्या घरात रहायला मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आज बीएसयुपी योजनेतील घरकुले ५०० कुटूंबाना देता आली याचे विशेष समाधान वाटत असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले.
कल्याणकरांची मेट्रोची मागणी मागणी लक्षात घेऊन मेट्रो१२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. चांगल्या घरात रहायला मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आज बीएसयुपी योजनेतील घरकुले ५०० कुटूंबाना देता आली याचे विशेष समाधान वाटत असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले. pic.twitter.com/wlItdNQqVa
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 15, 2023