१० टक्के कोट्यातील १३३५ घरे बिल्डरांच्या ताब्यात, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 06:25 PM2021-01-28T18:25:39+5:302021-01-28T18:26:54+5:30

Kalyan News : दहा टक्के कोटय़ातील १३३५ आरक्षीत घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत केलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही ठिकाणी भाडय़ाने दिलेली आहेत.

BJP MLA Ganpat Gaikwad's shocking information that 1335 houses with 10% quota are in the possession of builders | १० टक्के कोट्यातील १३३५ घरे बिल्डरांच्या ताब्यात, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धक्कादायक माहिती

१० टक्के कोट्यातील १३३५ घरे बिल्डरांच्या ताब्यात, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धक्कादायक माहिती

Next

कल्याण - दहा टक्के कोटय़ातील १३३५ आरक्षीत घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत केलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही ठिकाणी भाडय़ाने दिलेली आहेत. ही घरे महापालिकेने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार गायकवाड यांनी महापालिका आयक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. आयुक्तांच्या भेटीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. महापालिका हद्दीत 1क् टक्के कोटय़ातील घरे बिल्डरांच्या ताब्यात आहे. ही घरे महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. काही ठिकाणी भाडय़ो दिलेली आहेत. याविषयी आयुक्तांनी हात वरती केले आहे. हा विषय ठाणो जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. त्यांच्याकडून ही कारवाई केली पाहिजे असे सांगितले आहे. आमदार गायकवाड यांनी १३३५ घरे महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याची बाब माहिती अधिकारात माहिती मागवून घेतली होती. आमदारांचा हा गौप्यस्फोट पाहता महापालिका 10 टक्के कोटय़ातील घरे ताब्यात घेण्याबाबत किती उदासीन आहे की बाब समोर आली आहे.

नुकताच कल्याण स्टेशन पश्चीम परिसरातील स्मार्ट सिटी सुधारणा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पूव्रेतील विकास कामांना प्राधान्य दिलेले नाही. काही ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. महापालिका शून्य कचरा मोहिम राबवित असली तरी अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उलला जात नाही. घंडागाडीवर कामगारांनी कोरोना काळात काम केले आहे. त्यांना पगार दिला जात नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्यावरील चेंबर्स झाकणो फुटली आहे.

त्याच्या दुरुस्ती कामाचे बिल कंत्रटदार लाटत आहे. या कामाकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी आयुक्तांशी केलेल्या चर्चे दरम्यान केली. कल्याण पूव्रेतील चिंचपाडा, माणेरे, आशेळे, नांदीवली, वसार, डावलपाडा, द्वारली या भागात  पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. या भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पुना लिंक रोडच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट सोडले आहे. मलंग रोडवरील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कोणत्या कारणामुळे थांबले आहे याची माहिती आमदार गायकवड यांनी आयुक्तांकडे मागितली.

या विविध प्रकरणात आयुक्तांनी भेट देऊन पाहणी करावी. हे विषय मार्गी लावण्यात यावे अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल असे आश्वासन आमदारांना चर्चेअंती  दिले आहे.

Web Title: BJP MLA Ganpat Gaikwad's shocking information that 1335 houses with 10% quota are in the possession of builders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण