भाजपा पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण, कार्यालयावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 03:04 PM2021-08-24T15:04:49+5:302021-08-24T15:33:28+5:30
Kalyan : राणे विरुद्ध शिवसेना हा वाद आता विकोपाला गेला असून कल्याणमध्ये शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक केली.
कल्याण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगड येथे पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या विधानाचे पडसाद ठिकठिकाणी उमटायला सुरुवात झाली असून कल्याणातील शिवसैनिक मात्र मंगळवारी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
राणे विरुद्ध शिवसेना हा वाद आता विकोपाला गेला असून कल्याणमध्ये शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक केली. इतकेच नाही तर भाजपा पदाधिका-याला देखील मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये विशेषतः भाजपा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात झाला होता.
कल्याणच्या देवी अहिल्याबाई होळकर चौकात असणाऱ्या भाजपा कार्यालयाला शिवसेनेने लक्ष केले. या कार्यालयावर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक करत या कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळी शिवसेनेला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
भाजपा पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण, कार्यालयावर दगडफेकhttps://t.co/CbvSFUjpi9#NarayanRanepic.twitter.com/qktMvtAVZl
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांच्यासह शिवसेनेचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच भाजपा पदाधिकारी कार्यालयाबाहेर जमले असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.