मयत विद्या पाटील यांच्या कुटुंबियांना भाजपतर्फे १ लाखाचे अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 02:11 PM2021-06-07T14:11:57+5:302021-06-07T14:12:16+5:30
कुटुंबातील एकाला रेल्वेत नोकरी लावण्याचे पक्षाचे प्रयत्न
डोंबिवली: कळवा रेल्वे स्टेशनच्या इथे मोबाइल चोराच्या झटापटीमध्ये डोंबिवलीच्या विद्या पाटील यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात तीन लहान अपत्य आहेत, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या घरातील एका सदस्याला रेल्वेत नोकरी मिळावी आणि आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.
पक्षाच्या वतीने सोमवारी प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेत १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले. रेल्वेतील नोकरीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार भाजप वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत आहे. त्याची माहिती देण्यासाठी वाघ यांनी डोंबिवलीमध्ये येऊन त्या कुटुंबाची भेट घेत मदत दिली, पण ती मदत6 तुटपुंजी असली तरी सर्वांनी त्यांना मदत करावी व रेल्वेने त्यांना आर्थिक मदत करून घरातील एका व्यक्तिला रेल्वे मध्ये नोकरीत सामाविष्ट करुन घ्यावे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनीही काही दिवसापूर्वी त्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली होती.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, नगरसेविका कविता म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभूघाटे, समीर चिटणीस, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी, मनीषा राणे, माजी नगरसेविका सुनीता पाटील ,पूनम पाटील विद्या म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.