भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी डोंबिवलीत; रविंद्र चव्हाण यांची माहिती

By अनिकेत घमंडी | Published: October 27, 2023 05:51 PM2023-10-27T17:51:49+5:302023-10-27T17:52:07+5:30

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली दौऱ्याची माहिती

BJP state president Chandrasekhar Bawankule in Dombivli on Sunday; Information from Ravindra Chavan | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी डोंबिवलीत; रविंद्र चव्हाण यांची माहिती

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी डोंबिवलीत; रविंद्र चव्हाण यांची माहिती

डोंबिवली: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी डोंबिवलीच्या दौर्यावर आहेत. शहरातील पक्ष कार्यकर्त्यांसह पदाधिकारी आदीना ते मार्गदर्शन करणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. घर चलो संपर्क अभियानातून ते नागरिकांची मत जाणून घेणार आहेत. येथील फडके पथ येथे दुपारी १ वाजता होणार असून सकाळी ११ वाजता छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवलून रॅली निघणार आहे.

सकाळी ९ वाजता ते कार्यकर्त्यांमवेत संवाद साधणार आहेत. सार्वजनिक बांधकाम।मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बावनकुळे यांच्या दौर्याबाबत शुक्रवारी माहिती दिली. इंदिरा गांधी चौक, अप्पा दातार चौक, ब्राह्मण सभा आदी ठिकाणी ते नागरिकांशी चर्चा करतील. ब्राह्मण सभा येथे ते कार्यकर्ते, वोरियर्स यांची बैठक ते घेणार आहेत.

Web Title: BJP state president Chandrasekhar Bawankule in Dombivli on Sunday; Information from Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.