तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन
By अनिकेत घमंडी | Published: March 1, 2024 02:29 PM2024-03-01T14:29:30+5:302024-03-01T14:29:49+5:30
या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली
डोंबिवली : पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहानला यांनी संदेशखाली येथील महिलेवर अत्याचार केले आहे तरी त्यांना 55 दिवस लपवून ठेवल्याच्या निषेधार्थ कल्याण जिल्हा भाजप महिला मोर्चा तर्फे आज कल्याण येथील शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले,
पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी खुद्द एक महिला असतानाही इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जातोय. त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे गुंडच या अत्याचारांमध्ये सामील आहेत. संदेशखालीतल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना तर फक्त हिमनगाचं टोक आहेत…
या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली..आज संपुर्ण राज्यभरात भाजप महिला मोर्चा कडून आंदोलन करण्यातं आले. ममता बॅनर्जींनी तृणमूलच्या गुंडांचा नंगानाच महिलांवरील अत्याचारांची निःष्पक्षपणे व तातडीने चौकशीने करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवाय,
५५ दिवस या नराधमाला ममता सरकारने दडवून ठेवले पश्चिम बंगाल भाजपने या प्रकरणाचा पाठपुरावा केला वेळोवेळी आंदोलन केली या दबावानेच या हरामखोर शहाजहानला काल पकडण्यात आलं पण पोलिसांसमोर त्याची जी देहशैली होती त्यात दाल मे कुछ काला नही यहा तो पुरी दाल ही काली दिख रही थी…पश्चिम बंगालच्या आमच्या भगिनींना न्याय मिळाल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असे कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा रेखा चौधरी यांनी सांगितले,
यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष होळकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर अध्यक्षा वैशाली पाटील, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्षा सारिका पाटील, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस प्रीती दीक्षित, राजश्री राजपुरोहित आदी उपस्थित होते.