युतीत पहिली ठिणगी? कल्याणात शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपा; लोकसभेला काम न करण्याचा ठराव
By अनिकेत घमंडी | Published: June 8, 2023 05:18 PM2023-06-08T17:18:18+5:302023-06-08T17:26:45+5:30
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठराव
डोंबिवली: लोकसभा निवडणुकीआधिच शिवसेना भाजपमध्ये सार काही आलबेल नसल्याचे चित्र गुरूवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. ती आढावा बैठक कल्याण पूर्व येथे तिसाई देवी हॉलमध्ये संपन्न झाली. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना वाटते तेवढी त्यांची लोकसभा निवडणूक सोपी नसल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होती.
आतापर्यंत चर्चा होणे आणि प्रत्यक्ष ठराव करण्यापर्यन्त विषय जाणे हे गंभीर असल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त।केले. कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आढावा बैठक घेतली, त्यामध्ये मंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षे कार्यकाळपूर्तीच्या निमित्ताने अभिनंदन ठराव प्रस्ताव ठेवला, त्याला उपस्थित शेकडो पदाधिकार्यांनी मंजुरी दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी बागडेंची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे।काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असा प्रस्ताव सूचक नात्याने मांडला, त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले,आणि तो ठराव पारित करण्यात आला.
मंत्री चव्हाण हे आगरी कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन सोहळ्याला देखील अनुपस्थित राहिले, जर ते।मंत्री म्हणून केवळ भाजप कल्याण।जिल्ह्याचा निर्णय म्हणून तेथे जाणे टाळत असतील तर येथील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आदींनी देखील आपल्याच सहकार्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्र यायला हवे. मंडळ अध्यक्ष नंदू।जोशी यांच्यावर।विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राजकीय आकसापोटी हा गुन्हा।दाखल झाला असून पोलीस अधिकाऱ्यांनी निपक्षपणे कार्यरत असायला हवे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे बागडे या व्यक्तिविरुद्ध नव्हे तर प्रवृत्तीला विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावेळी चव्हाण यांच्या पंतप्रधान अभिनंदन प्रस्तावानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद पवार, नेते जगन्नाथ पाटील आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.