आरटीओच्या आश्वासनामुळे भाजपच्या रिक्षा युनियनचे आंदोलन मागे
By अनिकेत घमंडी | Published: July 5, 2024 06:16 PM2024-07-05T18:16:24+5:302024-07-05T18:16:39+5:30
आरटीओच्या मनमानी आणि भ्रष्टाचार विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ते आंदोलन करण्यात येणार होते.
डोंबिवली: आरटीओ विभागाने शुक्रवारी दिलेल्या लेखी अश्वासनांवर विश्वास ठेवून तूर्तास सोमवारी भाजप प्रणित रिक्षा युनियन कल्याण शीळ रस्ता रोको, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार।होती ते स्थगित करण्यात आले आहे.
आरटीओच्या मनमानी आणि भ्रष्टाचार विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ते आंदोलन करण्यात येणार होते. याबाबत पक्षाच्या वाहतूक सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची व आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. आरटीओ रमेश कललूरकर यांनी वाहनचालकाना फिटनेस सर्टिफिकेटसह अन्य कामात दिरंगाई करण्यात येत नाही, तसेच कोणतेही काम।अडवून ठेवण्यात येत नाही।असे सांगण्यात आले. तसेच याबाबत काही जाणवले तर थेट।अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी।केले.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, कल्याण।शीळ रस्ता महत्वाचा असून तेथे अहोरात्र वाहतूक सुरू असते, त्यामुळे त्याचा त्रास सामान्यांना होईल याचा विचार करावा, शाळकरी विद्यार्थीही त्यात असतात. त्यामुळे असा निर्णय घेऊ नये, चर्चेतून सुधारणा करता येतील, आंदोलनातून तिढा वाढेल असे काही संघटनाही करू।नये असे आवाहन आरटीओने।केले. त्यानुसार जर कामे जलद होणार असतील तर आंदोलनाची वेळ येणार नाही, तरी साधारण महिनाभर वाट बघून कार्यप्रणालीत सुधारणा झाली नाही तर मात्र पत्र न देता थेट आंदोलन करून आरटीओला।जाब विचारण्यात येईल असे माळेकर म्हणाले. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून तूर्त रास्ता रोको न करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर।केले.