उल्हासनगरमधील संच्युरी कंपनीत ब्लॉस्ट! ३ जणांचा मृत्यू तर १५ हून अधिक जखमी
By सदानंद नाईक | Published: September 23, 2023 02:05 PM2023-09-23T14:05:07+5:302023-09-23T14:14:24+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरात संच्युरी कंपनीतील एका प्लॅन्ट मध्ये दुपारी ब्लास्ट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला.
उल्हासनगर : उल्हासनगर शहाड गावठाण येथील संच्युरी रेयॉन कंपनीतील सीएस-२ प्लॅन्ट मध्ये दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ब्लॉस्ट होऊन शैलेश यादव, राजेश श्रीवास्तव, अनंत डोंगोरे हे तीन जण मृत्यू झाले आहे. तर सागर झालटे, अशोक शर्मा, टँकर चालक पंडित मोरे यांच्यासह १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरात संच्युरी कंपनीतील एका प्लॅन्ट मध्ये दुपारी ब्लास्ट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर १५ जणांपेक्षा जास्त जण जखमी झाले. कंपनीतील ब्लॉस्टच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
कंपनीच्यावतीने अद्यापही कोणतीही माहिती दिली नसून कंपनी समोर कामगारांच्या नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली. माजी आमदार पप्पु कलानी यांनी सर्वप्रथम संच्युरी कंपनीच्या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची चौकशी केली. त्यानंतर आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहाराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक नेत्यांनी गर्दी केली. शिवसेनेचे अरुण अशान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनेच्या पाहणीसाठी येणार असल्याची माहिती दिली.