आशेळे पाड्यात सुरु झाली बोरुची शाळा; कायद्याने वागा लोकचळवळ अन् सहेरचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:39 PM2021-01-04T13:39:32+5:302021-01-04T13:39:44+5:30

आशेळेपाडा येथील भंगारवेचक, मोलकरणी, नाका  कामगार यांच्या वसाहतीत ही शाळा सुरु करण्यात आली आहे.

Boruchi school started in Ashele Pada; Initiative of the people's movement Ansher by law | आशेळे पाड्यात सुरु झाली बोरुची शाळा; कायद्याने वागा लोकचळवळ अन् सहेरचा पुढाकार

आशेळे पाड्यात सुरु झाली बोरुची शाळा; कायद्याने वागा लोकचळवळ अन् सहेरचा पुढाकार

Next

कल्याण- कायद्याने वागा लोकचळवळ आणि सहेर या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आशेळेपाडा येथे काल सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून बोरुची शाळा सुरु करण्यात आली आहे. ही शाळा बिनघंटीची आहे.

टीएचआर महाराष्ट्र फेडरेशनच्या उपाध्यक्षा व उद्योजिका जयक्षी देशमुख यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कन्हैय्या थोरात, कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रमुख राज असरोंडकर, नायब तहसीलदार सुखदेव गवई, समाजिक कार्यकर्ते कमलाकर पवार, वकिल स्वप्नील पाटील, कल्पेश माने  आदी मान्यवर उपस्थित होते.

आशेळेपाडा येथील भंगारवेचक, मोलकरणी, नाका  कामगार यांच्या वसाहतीत ही शाळा सुरु करण्यात आली आहे. झोपडपट्टीतील आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मुलांसाठी ही शाळा सुरु करण्यात आली आहे. या शाळेत येणा:या अनेक विद्याथ्र्याकडे स्मार्ट फोन नाही. लॉकडाऊनमध्ये अशा मुलांचा शालेय अभ्यास ऑनलाईन शिक्षणाद्वारे करता येणो शक्य नव्हते. 

आर्थिक दृष्टय़ा दुर्बल असलेल्या वर्गातील विद्याथ्र्यामध्ये भाषिक कौशल्ये वाढीस लागून अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी ही सामाजिक जाणीव ठेवून कायद्याने वागा लोक चळवळ आणि सहेर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही शाळा सुरु केली असल्याची माहिती सोशल एक्शन फॉर हेल्थ अॅण्ड एज्युकेशन राईट अर्थात सहेरचे सचिव सुनिल अहिरे यांनी सांगितले.

अहिरे हे असंघिटत कष्टकरी कामगार संघटनेचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळेच नाका कामगार, घरकाम कामगार कुटुंबांशी त्यांचा जवळचा संपर्क व संबंध आहे. तोच आमच्या या उपक्र मातला सहभाग असेल, असे या उपक्र मासाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे स्मार्ट फाऊंडेशनचे प्रफुल केदारे यांनी सांगितले.

Web Title: Boruchi school started in Ashele Pada; Initiative of the people's movement Ansher by law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.