लाखो रुपये देऊन घर तर घेतले; पण ना प्यायला पाणी, ना जायला रस्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 10:33 AM2023-05-26T10:33:48+5:302023-05-26T10:33:58+5:30
वसाहतीतील पाणीप्रश्न गंभीर
- मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण - शीळ रोडलगत टाटा नाकानजीक मोठी गृहसंकुल वसाहत आहे. या वसाहतीत १९ इमारती आहेत. या १९ इमारतीत १३४० सदनिका आहेत. या १३४० सदनिकाधारकांना कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे या नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. या वसाहतीमधील घरे बिल्डरने २००७ मध्ये बांधली. या घराचा ताबा ग्राहकांना दिला गेला. त्यानंतर गृह निर्माण सोसायटी २०१० मध्ये अस्तित्वात आली.
या मोठ्या वसाहतीचा परिसर यापूर्वी कल्याण ग्रामीण भागात होता. २७ गावेही महापालिकेत समाविष्ट नव्हती. त्यामुळे या परिसराला ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जातो. आता ही वसाहत आणि २७ गावे ही महापालिकेत आहे. त्यामुळे या वसाहतीला पाणी देणे, ही जबाबदारी महापालिकेची आहे. एमआयडीसीने पाण्याचा कोटाही वाढविला आहे. एमआयडीसीकडून केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा दाबही कमी असल्याने रहिवासी त्रस्त आहेत.
घरे महाग; पण ना रस्ते; ना पाणी
दहा वर्षांपूर्वी वन रूम किचन बेडरूमकरिता २० ते २२ लाख रुपये मोजले होते. टू रूम वन रूम किचन बेडरूमकरिता ३५ लाख रुपये मोजले होते. घर महाग मिळाले. मात्र ना रस्ते ना पाणी.
पावसाळ्यात पायी चालणे कठीण
रस्ते व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात रस्ते चिखलमय असतात. त्यातून वाट काढत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते.
नालेही नाहीत
सोसायटीच्या सांडपाण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही.
घाण पाणीही रस्त्यावर
सोसायटीच्या मागच्या बाजूला ड्रेनेजचे पाइप नसल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्याचा नागरिकांना त्रास होतो.
टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च
४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.
समस्या जैसे थे
सोसायटीला संरक्षक भिंत नाही. तसेच पथदिव्यांची व्यवस्था नाही.
-चेतन चव्हाण, रहिवासी.
सोसायटीच्या पाणी समस्येविषयी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, कायमस्वरूपी समस्या सुटलेली नाही.
-अमरसिंग चव्हाण, रहिवासी.
या वसाहतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बूस्टर पंप बसविला आहे. मध्यंतरी एमआयडीसीकडूनच पाणीपुरवठा कमी केला जात होता. कारण जलवाहिनी फुटली होती. आठ दिवस पाण्याची समस्या होती.
-किरण वाघमारे, अभियंता,
टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च
४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात. पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी.