कल्याण रेल्वे स्टेशनवर खोके भरून स्फोटके ; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:11 AM2024-02-22T06:11:48+5:302024-02-22T06:12:14+5:30
रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ च्या सरकत्या जिन्याजवळ दोन मोठे बॉक्स असल्याचे सफाई कामगाराने पाहिले. त्याने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला बोलावून घेतले. या पथकाने बॉक्सची तपासणी केली.
कल्याण (जि. ठाणे) : कल्याण रेल्वेस्थानकात बुधवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास ५४ डिटोनेटर सापडल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वेस्थानकात हे डिटोनेटर कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले होते? याचा तपास कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत.
रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ च्या सरकत्या जिन्याजवळ दोन मोठे बॉक्स असल्याचे सफाई कामगाराने पाहिले. त्याने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला बोलावून घेतले. या पथकाने बॉक्सची तपासणी केली. त्यात डिटोनेटर होते.
मध्य रेल्वेचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, ५४ डिटोनेटर सापडले असून ते इलेक्ट्रिक आहेत. विहिरी आणि खदान या ठिकाणी ब्लास्टिंगसाठी ते वापरले जाते. या डिटोनेटरचा स्फोट होण्याची शक्यता नव्हती. सीसीटीव्हीच्या मदतीने हे बॉक्स ठेवणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.