ब्राह्मण नगरी डोंबिवलीतून याज्ञवक्य पुरस्काराचे मानकरी निर्माण व्हावेत: सुधीर बर्डे
By अनिकेत घमंडी | Published: March 26, 2023 09:47 AM2023-03-26T09:47:57+5:302023-03-26T09:48:45+5:30
गजानन माने यांना डोंबिवली भूषण पुरस्कार स्मार्त चुडामणी पंडित शांताराम भानोसे याज्ञावल्क्य पुरस्काराने सन्मानित
डोंबिवली: या सारस्वतांच्या नगरीतून याज्ञवल्क्य पुरस्कारासाठी नामांकन यायला हवीत, पण ती येथून न येता पुणे, नाशिक अन्य महाराष्ट्रातून नाव शोधावी लागतात हे काही योग्य नसून आगामी काळात डोंबिवलीतून अशी नाव यावीत, स्मार्त चुडामणी ही मानाची पदवी मिळवलेले मान्यवर आपल्या ठिकाणी का निर्माण होत नाहीत अशी खंत शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष सुधीर बर्डे यांनी व्यक्त केली.
त्या संस्थेच्या माध्यमातून शनिवारी पश्चिमेकडील ज्ञानेश्वर कार्यालयात पद्मश्री गजानन माने यांना डोंबिवली भूषण तर नाशिक येथील स्मार्त चुडामणी शांताराम भानोसे यांना सँस्थेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा याज्ञवल्क्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी याज्ञवल्क्य पुरस्कारासाठी शहरातील पंडित मिळत नसल्याचे सांगत बर्डे यांनी आवाहन।केले, आणि भानोसे यांनी तसे विद्यार्थी तयार करावेत अशी।मागणी।केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात प्रवचनकार सु ग शेवडे होते, त्यांनी संस्थेच्या कार्याचा धावता आढावा घेत अशा पुसरकरांचे कौतुक केले. तसेच कोणाच्याही राहणीमानावर जाऊ नये असे सांगत ७ वेळा अमेरिकावारीसह विविध ठिकाणी वेळोवेळी परदेशात जाऊन देखील माझा पोशाख कधी सोडला नसल्याचे सांगत आपण ज्ञान, संस्कार संस्कृती यातून पुढे जायला हवे असे आवाहन त्यांनी केले.
डोंबिवली भूषण पुरस्कार मिळाल्यावर गजानन माने यांनी आनन्द झाला असे सांगत ज्या कार्यासाठी पुरस्कार मिळाला कुष्ठरोगी नागरिकांचे जीवन जवळून बघताना त्यांचे देखील मित्र व्हा असे आवाहन।केले. ते देखील समाजाचे घटक असून त्यांना दुर्लक्षित करू नका असे ते म्हणाले.तसेच कोणीही कुठेललेही कार्य करत रहा त्याची दखल समाज घेतच असतो, फक्त कामात निस्पृहपणा, सचोटी आणि पारदर्शकता असायला हवी असेही त्यांनी स्पष्ट केले. स्मार्त चुडामणी पंडित भानोसे यांनीही संस्थेने हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच आगामी।काळात याज्ञवल्क्य पुरस्कारासाठी उत्तमोत्तम गुरुजी तयार करण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्यासाठी तयार असल्याचे म्हंटले.
तिन्ही मान्यवर मंडळींना उपस्थित ब्रह्मवृंदाने शांतीमंत्र म्हणून त्यानंतर औक्षण करून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, आणि सत्कारमूर्तींना प्रत्येकी काही रक्कमेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. यानिमित्त संस्कृत पंडित, १०४ वर्षांचे ज्येष्ठ गुरुजी केशव भगत यांचा संस्थेने सन्मान।केला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप जोशी गुरुजी यांनी प्रास्ताविक केले, त्यावेळी व्यासपीठावर मान्यवरामांमवेत विश्वस्त अध्यक्ष मधुकर कुलकर्णी, मुकुंद जोशी, कार्याध्यक्ष यतीन पाठक आदी मान्यवर देखील उपस्थित होते. -
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"