धक्कादायक! सावत्र आईची अमानुष मारहाण; साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By प्रशांत माने | Published: September 30, 2022 11:48 AM2022-09-30T11:48:14+5:302022-09-30T11:49:25+5:30

ही घटना पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाडवाडी येथील सिताबाई निवास येथे काल दुपारी घडली.

brutal beating of stepmother; Death of a three-and-a-half-year-old boy in dombivali | धक्कादायक! सावत्र आईची अमानुष मारहाण; साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

धक्कादायक! सावत्र आईची अमानुष मारहाण; साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

googlenewsNext

प्रशांत माने

डोंबिवलीः सावत्र आईने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत  कार्तिक जैस्वाल या साडेतीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून आज सकाळी सावत्र आईला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अंतिमादेवी संजय जैस्वाल (वय२८) असे तीचे नाव आहे. 

ही घटना पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाडवाडी येथील सिताबाई निवास येथे काल दुपारी घडली. अंतिमादेवी हिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत तर कार्तिक आणि त्याचा सात वर्षाचा मोठा भाऊ अशी दोन सावत्र मुले आहेत. कार्तिक चे वडील संजय हे इलेक्ट्रिशियनची कामे करतात. अंतिमादेवी ही नेहमी सावत्र मुलांना मारहाण करायची. काल दुपारी तीन च्या सुमारास तीने साडेतीन वर्षाच्या कार्तिकला लाथा बुक्यांनी आणि वायरने बेदम अमानुषपणे मारहाण केली. या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला. त्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले गेले. परंतू कार्तिक ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मारहाणीत शरीराच्या अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिल्याचे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी सांगितले. दरम्यान आज सकाळी कार्तिकला अमानुषपणे मारहाण करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अंतिमादेवी हिला अटक करण्यात आली आहे. तीला थोडयाच वेळात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल असे आफळे म्हणाले.

Web Title: brutal beating of stepmother; Death of a three-and-a-half-year-old boy in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.